Sunday, September 28, 2008

यशस्वी जिवनाची सुरेल सुत्रं

अनेक चढ-उतार येवुनही जीवनास यशापर्यंत नेण्याची आपली कसरत अजूनही सुरुच आहे. यशस्वी जीवनाच्या या कसरतीत सुरेल संगीताची साथ मिळत असेल, तर त्यापेक्षा दुसरे भाग्य ते कोणते? सा,रे,ग,म,प,ध,नि,सा मधले प्रत्येक अक्षर, जीवन सुखी, निरोगी आणि यशस्वी बनवण्याचा मार्ग दाखवते.

· सा : (सामंजस्य) नात्या-गोत्यांमधील गुंत्यामुळे जीवनात ताण-तणाव निर्माण होतो हे खरे असले, तरी नात्यांशिवाय जीवन अर्थहीन आहे। अर्थात, प्रत्येक नाते टिकविण्यासाठी सामंजस्य ठेवणे आवश्यक असते. हा समंजसपणा, थोडासा समजूतदारपणा हुशारी आणि सावधपणा असल्यास टिकून राहतो.


· रे : (रेग्युलॅरिटी) हे जीवन म्हणजे काही श्वासांचं वरदान आहे। या पृथ्वीतलावर जीवन जगण्यासाठी परमेश्वरानं आपल्याला एक निश्चित कालमर्यादा दिली आहे. आपण जर रेग्युलॅरिटी म्हणजे नियमीतपणाने प्रत्येक काम करु लागलो, तर या ठराविक आयुर्मानात आपण आपली उद्दिष्टे पूर्ण करु शकतो.


· ग : (गडबड, गोंधळ) आयुष्यात कधीही गोंधळून जाऊ नका। कारण, या अशा गोंधळलेल्या अवस्थेतच आपल्याकडून जास्तीत जास्त चुका घडून येण्याची शक्यता असते.


· म : (मन) आयुष्यातले चढ-उतार, सुख-दु:ख, सर्व काही सहजगत्या स्वीकारण्यासाठी मन कणखर असणे आवश्यक आहे। जय-पराजय या दोन्ही गोष्टी या मनावर तर अवलंबून आहेत.


· प : (परमेश्वरावरील विश्वास) परमेश्वराला, द्वैत वा अद्वैत यापैकी कुठल्याही रुपात माना, त्याच्या दया, करुणा, प्रेम व न्यायावर अपार श्रध्दा व विश्वास असलेल्यांना आत्मिक बळ हे मिळतेच मिळते। त्याची प्रार्थना केल्याने अशक्य गोष्टही शक्य होते.


· ध : (धन) आयुष्यात पैशाला अनन्यसाधारण महत्व असले, तरी त्याच्यामागे अंधाधुंद धावण्याने, स्वत:चा विनाशच ओढवला जातो। म्हणून, धन म्हणजे खूप काही आहे, पण सर्व काही नाही. हे समजून घेण्याची गरज आहे. प्रमाणिकपणाने आणि मेहनतीने कमावलेला पैसाच आयुष्यात सुख-समृध्दीसोबत समाधान आणू शकतो.


· नि : (स्वत:वर नियंत्रण ठेवा) वाणी, वर्तन आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवल्याने आयुष्यात सुखच सुख येते। वाणीवर नियंत्रण आणि क्रोधावर अंकुश ठेवल्याने खूप साऱ्या वाईट घटना टळल्या जाऊ शकतात. मधुन वाणीने, लोकांची मने जिंकली जाऊ शकतात.


· सा : (सावधपणा) बेसावधपणामुळे आयुष्याचे खूप नुकसान होते, हे काही वेगळे सांगायला नको. सावधानता बाळगून काम केल्याने, त्यात चूका घडून येण्याची शक्यताच संपते. आणि प्रत्येक काम, मनावर कुठल्याही प्रकारचा ताण न येता सहजगत्या पूर्ण होते.

संयम व सरळपणा :

अतिउत्साह टाळा. संयम आणि सरळपणाने वागा. अतिउत्साहीपणा आणि क्रोध कोणत्याच समस्येचे समाधान करुन शकत नाहीत. कोणत्याही समस्येचे निराकारण शांतता आणि संयमाद्वारेच केले जाऊ शकते. याउलट, संयम सोडल्याने अथवा क्रोध करण्याने किरकोळ समस्यादेखील उग्र रुप धारण करुन शकते. संयम आणि सरळपणा यांचा अभावच अपयशाला कारणीभूत ठरतो.

बघा विचार करा!

· ज्याने आपुलकी गमावली त्याने सर्वस्व गमावले.
· मन प्रसन्न ठेवल्याने दु:खे दूर होतात, बुध्दी स्थिर राहते.
· सर्वांवर प्रेम करा, काही जणांवर विश्वास ठेवा, वाईट मात्र कोणाचेच करु नका।
· सत्य कशाच्या बाहेर नाही तसेच सत्याच्या बाहेरही काही नाही.

करिअरमधील यशासाठी

आपल्या करिअरचा ग्राफ उंचावत जावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. करिअरमध्ये यश मिळविण्याचे काही बेसिक नियम असतात ज्यांचे पालन करणे गरजेचे आहे. जाणून घेऊ या ते नियम.

आपल्या चुकांपासून शिका : जे स्वबळावर यश मिळवू इच्छीत असतता ते आपल्या चुकांतून धडा घेणे जाणत असतात. आपल्या विचारात सकारात्मक बदल करुन मार्गात येणा-या छोटया मोठया अडचणींवर मात करा.

सल्ला घेण्यास तत्परता दाखवा : यशाच्या मुख्य नियमातील दुसरा महत्वाचा नियम इतरांचे ऐकून घेणे यातून आपल्याला महत्वाचे टर्निग पॉइंटही मिळू शकतात.

विलंब टाळा : सुसंधी कोणाची वाट पहात नसते. आणि गेलेली वेळही परतून येत नसते. यासाठी कोणतेही काम वेळीच पूर्ण करा.

हाती घ्याल ते तडीस न्या : विलंबानंतरचा महत्वाचा इशारा म्हणजे एखादया कामाला सुरुवात केल्यानंतर कितीही अडचणी आल्या तरी ते पूर्ण करा. परंतू त्यासाठी शॉर्टकर्ट वापरु नका.

वेगळे काम करा : आखीव, रेखीव रुळलेल्या मार्गाने काम केल्यास यश मिळत नाही. अपयशी माणसांचा एक सर्वसामान्य दोष म्हणजे ते नेहमी नवे काही करुन दाखविण्याची व कष्ट करण्याची टाळटाळ करतात.

इतरांना दोष देऊ नका : वेळेचा अपव्यय व कामात रस न घेणे हे अपयशाला कारणीभूत असतात, अपयशी माणसे स्थिती सुधारण्याऐवजी इतरांना दोष देत राहतात.

कंपनीची निवड दक्षतेने करा : अपयश अपयशी लोकांकडे खेचते. यशस्वी व्यक्ती यशस्वी व्यक्तींकडेच जातात हे लक्षात ठेवूनच जॉब स्विकारा.

ध्येय निश्चिती

आपली झेप कुठवर जाऊ शकते, याच्या मर्यादा ओळखून आपले ध्येय निश्चित केल्यास असे ध्येय निश्चितपणे पूर्ण करता येते. आपल्याला आकाशातले तारे आवडले म्हणून काही ते आपल्याला मिळवता येत नसतात; पण तारे मिळाले नाहीत म्हणूनही दु:ख करीत बसायचे नसते. उलट जे आपल्या कक्षेत आहे किंवा आपल्या क्षमतेत आहे असे एखादे लक्ष्य समोर ठेवुन प्राप्त करायचे असते.

प्रत्येक काम श्रेष्ठच!

प्रत्येक जण आपल्या नव्या दिवसाची सुरुवात कुठल्या ना कुठल्या तरी कामापासून करतोच; पण ते काम कोणते आहे आणि कसे आहे, याचा विचार करण्याचा आपण कधी प्रयत्न करतो का? आपण त्या कामाची सुरुवात मन लावून आणि हृदयापासून करतो का? आपण विश्वास आणि निष्ठेने कामाला हात घालतो, की अपयशी भावना ठेवून ? त्यामुळे मनुष्याने कुठलेही काम हलके समजू नये. जगातले प्रत्येक काम हे श्रेष्ठच असते. महत्वाचे एवढेच की, ते काम आपण किती विश्वासाने पूर्ण करतो.

नावांत काय आहे?

ऍडोब

ऍडोबचा संस्थापक जॉन वॉरनॉक याच्या घराच्या मागे ऍडोब खाडी आहे. तिच्यावरुन हे नाव घेतलंय.

अपाचे

'अपाचे' च्या संस्थापकांनी एनसीएसएच्या एचटीटीपीडी डोमनसाठी लिहिलेल्या कोडवर 'पॅचेस' लावण्यापासून सुरुवात केली होती. त्यातून 'अ पॅची' सर्व्हर तया झाला आणि अपाचे हे नाव जन्माला आलं.

ऍपल

सफरचंद हे ऍपल कंम्प्युटर्सचा संस्थापक स्टीव्ह जॉब्ज याचं आवडतं फळ. रजिस्ट्रेशनसाठी कंपनीचं नाव ठरवण्यात त्याचे तीन महिने वाया गेले. शेवटच्या दिवशी त्याने सहकाऱ्यांना दम दिला. ' ब-या बोलाने संध्याकाळी पाच वाजायच्या आत चांगलं नाव सुचवा कंपनीला. नाहीतर मी ऍपल कम्प्युटर्स असं नाव देईन.'

त्याच्या सहका-यांना 'चांगल' नाव सुचलं नाही, हे उघड आहे!

सिस्को

'सीआयएससीओ' हे स्पेलिंग म्हणजे मोठया नावाचा शॉर्ट फॉर्म वाटतो ना. पण, प्रत्यक्षात ते सॅन फ्रॅन्सिस्कोचं लघुरुप आहे.

गुगल

'गुगोल' म्हणजे एकावर शंभर शून्य दिल्यावर जी होईल ती संख्या. हे गुगलचं सुरुवातीचं नाव होतं. आमच्या इंजिनवर ही एवढी माहिती शोधता येईल शकते, अशा आत्मविश्वासातून ते नाव देण्यात आलं होतं। गुगलची कल्पना ज्यांच्या डोक्यात आली त्या सर्जी बिन आणि लॅरी पेज या दोघांनी या प्रोजेक्टमध्ये पैसे घालायला उत्सुक असलेल्या एका मालदारापुढे प्रेझेन्टेशन केलं. तो इम्प्रेस झाला आणि या दोघांना चेकही मिळाला... तो 'गूगोल' ऐवजी चुकून 'गुगल' या नावाने आला होता.
तो वटणं गरजेचं होतं.... त्या गरजेतून गुगल जन्माला आलं.

Thursday, September 25, 2008

प्रयत्नांनी स्वप्ने साकार करा.

* जी व्यक्ती अत्यंत सुंदर कल्पनांमध्ये मनापासून रमते ती व्यक्ती त्या कल्पना एक दिवस खऱ्या करुन दाखविते. जे आपली स्पप्ने मनात काळजीने बाळगून ते साकार होण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना जरुर यश मिळते. कोलंबस एका दुसऱ्या जगाची कल्पना मनात बाळगून होता. तो त्याच्या प्रयत्नात यशस्वी ठरला. आपल्या कल्पना मनात कायमच्या बाळगा. तुमची दृष्टी तुमच्या स्वप्नांवरच असू द्या. तुम्ही मनात आकारलेल्या सौदर्याला कायमचे स्थान द्या. तुमच्या अत्यंत शुध्द विचारांना मनात बाळगून ठेवा. ज्या सुंदर कल्पना तुम्ही मनात बाळगाल त्या खऱ्या जगात आणण्यासाठी मनापासून नक्कीच प्रयत्न कराल.

* कोणतीही इच्छा ती पुर्ण करण्यासाठी करा. कोणतीही कल्पना प्राप्त करण्यासाठीच करा. असे कधी झाले आहे का? आपण धीर धरुन प्रयत्न केल्यानंतरच इच्छा प्रदर्शित केल्याबरोबर पुर्ण होईल, असे कधी झाले आहे का? आपण धीर धरुन प्रयत्न केल्यानंतरच इच्छापुर्ती होते. तुम्ही जसे स्वप्न बघाल तसे व्हाल. तुमच्या कल्पनेत तुम्ही शेवटी कसे असले पाहिजे याचा विचार करा.

* आपणही तारुण्यात एखादयाच मुख्य ध्येयावर आपली दृष्टी ठेवा. आपली ही दृष्टी आणि इतर कल्पना यातील फरक समजून घ्या. आपली ही दृष्टी आणि इतर कल्पना यातील फरक समजूर घ्या. इतर कल्पना आणि आपल्या मुख्य ध्येयाच्या दृष्टीत घोटाळा करु नका. तुमचे खरोखरच विशेष ज्या गोष्टींवर प्रेम असते त्या गोष्टीवर हृदयपुर्वक दिव्यदृष्टी ठेवा.

* गंभीरातील गंभीर रुग्णाची प्रकृती अगदी ठिक होण्यात औषधांची भूमिका केवळ दहा टक्केच असते, असे डॉक्टरांचे मत आहे. रुग्ण 50 टक्के आपला सकारात्मक विचार व 40 टक्के डॉक्टरांच्या सकारात्मक विचाराने बरा होतो.

* असं कधीही म्हणु नका की पाच वर्षाचा काळ तर खूप मोठा आहे आणि तोपर्यत प्रगती करण्यासाठी मी थांबू शकत नाही. नेहमी असा विचार करा की मला तर 30 वर्षापर्यत उच्च पदावर राहायचे आहे. एवढया प्रदीर्घ काळात पाच वर्ष म्हणजे काय?

* आता काहीच घडु शकत नाही, असा नकारात्मक विचार कधीही करु नका तर प्रयत्न करायला हवा, असा होकरात्मक दृष्टीकोन बाळगा.

* मार्केटींगच्या क्षेत्रात असाल तर मी हे प्रॉडक्ट विकू शकणार नाही, असा विचार कदापी करु नका. तथापी एखादे प्रॉडक्ट तुम्ही विकू शकत नसाल तरीही असा विचार करा की, मला लवकरच असा एखादा फॉम्युला मिळेल की ज्यामुळे मी प्रॉडक्ट विकण्यात यशस्वी होईन.

* आजकाल स्पर्धा तर जबरदस्त आहे. त्याबाबत कोणही असहमत असू शकत नाही. तरीही अशा स्पर्धेत एखादाच कुणी फायदा लाटुन घेवुन जाईल. अस होवु शकत नाही. निश्चितपणे आपले कष्ट त्यासाठी उपयोगी ठरतील. कष्टाच्या आधारे तुम्हीही हा फायदा किंवा लाभा उठवु शकता.

* वेळेची किंमत जाणणे हा सर्वात मोठा शहाणपणा आहे. दुसऱ्याचा वाईटपणा, उणेदुणे पणा, फालतु गप्पा यात वेळ घालविणारे कधीच प्रगती करु शकत नाहीत.

* आजचे काम आजच पुर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करा. चालढकल, फाटे फोडणे यांतून काहीच साध्य होत नाही, हे नेमके लक्षात ठेवा।

* एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल, समजली नसेल तर ती दुसऱ्याकडून शिकुन घ्यायची सवय लावा. त्यात कमीपणा मानू नका.

Wednesday, September 24, 2008

बिझनेस मंत्र

* यशाला शॉर्टकट नसतो. व्यवसायात पूर्ण मार्ग वाटचाल करुन गेल्यावरच यश मिळते.
* दर्जेदार माल आणि उत्तम सेवा याद्वारेच तुम्ही ग्राहकांना प्रभावित करु शकता।
* व्यवसायात नफ्याचे प्रमाण वाढवायचे असेल तर अनावश्यक खर्च टाळायला हवेत।
* ग्राहकांशी नेहमी थेट आणि नेमक्या शब्दांत संवाद साधणे फायदेशिर ठरते.
* ज्याला इतरांवर आपला प्रभाव पाडण्याची इच्छा असते, त्याने कधीही कुणाचा अपमान करु नये.
* यश हे केळ मुक्कामाचे ठिकाण नव्हे, तर तो एक अखंड प्रवास आहे.
* माणसांची पारख करण्याचे कौशल्य हे सुखी जीवनाचे रहस्य आहे.
* भुतकाळाचे भान, वर्तमानाचं ज्ञान आणि भविष्याचं विज्ञान जेव्हा एकवटतं तेव्हाच प्रगतील सुरुवात होते.
* तुम्ही जे ध्येय ठरविले असेल, तसा आकार तुमच्या जिवनाला प्राप्त होईल.
* व्यवसायाची जाहिरात प्रभावी करायची असेल तर त्यासाठी व्यवसायाची पार्श्वभुमीही तितकीच प्रभावी असणे आवश्यक असते.
* तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणचे स्वागत कक्ष कसे आहे. यावरही तुमच्या व्यवसायाचे यश अवलंबून असते.
* व्यवसायातील प्रतिसर््पध्याचा पदोपदी अपमान करुन नव्हे; तर त्याच योग्य मान राखुन त्याच्याशी निखळ स्पर्धा करा.
* जगातील सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे समजूतदारपणा.
* मधुर वाणीच्या व्यावसायिकाच्या दारात दारिद्रय कधीही येत नाही.
* व्यवसायात तुमची गुंतवणूक किती आहे, यापेक्षाही महत्चाची बाब म्हणजे व्यवसायावर तुमची निष्ठा किती आहे?
* मनुष्याला जगण्यासाठी अन्नाची जेवढी गरज असते, तेवढीच वाचनाचीही गरज असते.
* प्रसन्न चित्ताने तुम्ही जे व्यवहार कराल ते फायदेशिर ठरतील.
* ग्राहकांच्या तक्रारी स्विकारण्यासाठी एक तक्रारपेटी तुमच्या व्यावसायाच्या जागेत असणे फार आवश्यक आहे.
* नुसत्या कल्पनेपेक्षा प्रत्यक्ष उदाहरण हे नेहमीच जास्त परिणामकारक असते.
* जो चालतो तोच पोहोचतो. जो फक्त विचार करीत राहतो तो कधीच पोहोचत नाही.
* माफक नफ्यासाठी तुम्ही ग्राहकांशी खोटे बोलाल तर भविष्य काळात तुम्हाला फार मोठा तोटा सहन करावा लागेल.
* व्यावसायिकाच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यावरही व्यवसायातील नफ्याचे प्रमाण अवलंबून असते.
* विक्रीपश्यात सेवेलाही व्यवसायात विक्रीइतकेच महत्व असते.
* व्यवसायासाठी असे ठिकाण निवडा तिथे तुमचे संभावित ग्राहक अगदी सहजपणे पोहचू शकतील.
* व्यवसायातील केवळ जमा-खर्चाचाच हिशोब ठेवू नका, तर अनावश्यक खर्चाचाही हिशोब ठेवा.
* काही गोष्टींना स्पष्ट शब्दांत नकार देणे हा गुण व्यवसायात फार महत्वाचा असतो.
* व्यवसाय करताना केवळ नफा मिळविण्याकडे लक्ष देवु नका, तर ग्राहकाचा विश्वास कसा मिळविता येईल, याकडेही लक्ष द्या.
* ग्राहक तुमच्या दुकानातून खरेदी करुन जात असताना ' आणखी काही हवंय का साहेब ? हा प्रश्न त्याला विचारायला मुळीच विसरु नका.
* बाजारात आलेले नवे उत्पादन विके्रत्याने आधी स्वत: पारखून घ्यावे. मग ते विक्रीसाठी उपलब्ध करावे.
* हातून घडलेल्या चुकांबाबत विचार करण्यात वेळ वाया घलवू नका, त्यापेक्षा भावी काळात चुका टाळता कशा येतील याबाबत प्रयत्न सुरु करा.
* तुम्हाला शक्य नसल्यास कामासाठी वेळीच स्पष्ट नकार द्यायला शिका. त्यामुळे तात्पुरता वाईटपणा आला, तरी पुढील अनेक कटकटी टाळता येता.
* काही निर्णय चुकीचे ठरले तरी चालतील, पण आपले निर्णय स्वत:च घेण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे.
* तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करा. जनसंपर्क वाढविण्याच्या दृष्टीने ते फायदेशिर ठरेल.
* तुम्ही तुमची कामे जितकी पुढे ढकलाल तितके यश तुमच्या पासून दुर जाईल.
* तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक नवपरिचीत व्यक्तीचे नाव अशा प्रकारे लक्षात ठेवा की पुढील भेटीत तुम्हाला त्या व्यक्तीला तिच्या नावाने संबोधता आले पाहिजे.
* तुम्ही दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्ही प्रगतीपथावर आहात असे म्हणता येईल.
* प्रत्येक वादाच्या मुद्दयावर, समस्येवर पहिला उपाय म्हणजे चर्चा, चर्चेतून अनेक प्रश्न सहजपणे सुटु शकतात.
* परिस्थितीप्रमाणे स्वत:ला बदलण्याची तयारी ठेवा. यश सदैव तुमच्या पाठीशी राहील.
* हाती घेतलेले काम आधी पूर्ण करा. मगच दुसऱ्या कामाकडे लक्ष द्या. एकावेळी अनेक कामे डोक्यात असतील तर कोणतेही काम व्यवस्थित पार पडणार नाही.
* तुम्ही दिवसभरात जे काही चांगले पाहाल किंवा ऐकाल त्यांची नोद डायरीत करुन ठेवा. त्याचा तुम्हाला भविष्यकाळात निश्चितच फायदा होईल.
* केवळ प्रयत्नांमुळे नव्हे; तर प्रयत्नांच्या सातत्यामुळे यश मिळते हे कधीही विसरु नका.
* ग्राहकाचा वेळ वाया न घालविण्याचे तत्व जो पाळतो, तोच व्यावसायीक यशस्वी होतो.
* कमी वेळात जास्त काम ' याचा अतिरेक टाळावा, कारण त्यातून अनेक प्रकारचे ताण व संघर्ष निर्माण होवुन शेवटी वेळेची हानीच होते.
* खोटेपणाचा आधार घेवुन नफा मिळविणे शक्य असते. परंतु तो नफा व्यावसायिकाला अनेक संकटांच्या जाळयात अडकवून टाकतो व त्यातून बाहेर पडता येणे शक्य नसते.
* वेळ : वेळेचं महत्व समजून घ्या. वेळ वाया घालवू नका. लाखो करोडो रुपये देवुनसुध्दा आपण वाया गेलेला एक क्षण विकत घेवू शकत नाही. वेळ तुमची तेव्हाच कदर करेल. जेव्हा तुम्ही वेळेबरोबर चालत रहाल.
* पुस्तक : बौध्दीक खुराक देणार, ज्ञान वाढवणारं सर्वात उपयोगी साधन चांगली पुस्तकं आपल्याला नेहमीचं उत्साहीत करतील, आणि नकारात्मक विचारांपासून दूर ठेवतील. म्हणतात ना वाचाल तर वाचाल.
* विचार : नव्या आणि चांगल्या विचारांचं नेहमीच स्वागत करा.
* मित्र : नेहमी चांगले आणि नवनवे मित्र बनविण्याचा प्रयत्न करा. यामुळे जगाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलू शकेल.
* आत्मपरिक्षण : वेळोवेळी आत्मपरिक्षण करुन स्वत:ला पारखा. आपल्या उणिवा शोधून काढून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करा. चांगली टीका करणारे आपले मित्रसुध्दा आपल्या वाईट सवयींना सुधारु शकतात.
* कधीही आपला विचार नकारात्मक नसावा. तो सकारात्मकच असला पाहिजे.
* हातावर हात ठेवून बसू नका तसेच केवळ स्वप्नेच पाहत राहू नका तर ती सत्यात आणण्यासाठी योग्य दिशेने पाऊल टाका.
* जीवनात रिस्क घ्यायला शिका, कारण रिस्क किंवा जोखमीविना कोणत्याही कामात यशाची खात्री बाळगता येत नाही.
* नेहमी आशावादी दृष्टीकोन बाळगा.
* आपला आत्मविश्वास टिकवून ठेवा, तसेच आपले निश्चयही ठाम असावेत.
* उत्साह कायम असावा, परंतु त्याचबरोबर अतिउत्साहापासूनही स्वत:चा बचाव करावा.
* निराशा आणि काळज्या दूर ठेवा.
* लहान सहान अपयशाने खचून जावु नका. लक्षात असून द्या, की जर तुम्हाला गुलाबाचं फूल हवे असेल तर त्यासाठी काटयांनादेखील तोंड द्याव लागेल.
* चांगले शिक्षण देणारी पुस्तके आणि नियतकालीके वाचा.आपल्या चुका सुधारा आणि इतरांशी तुलना करण्याची सवय सोडून द्या.

Monday, September 22, 2008

जोखीम उचलाल तरच यशस्वी व्हाल

घरात निवांत बसून यश मिळत नसते. यशस्वी होणसाठी धोका पत्करावा लागतो आणि आव्हानांना सामोरे जावे लागते, तेव्हा कोठे यश प्राप्त होते. तसे पाहिले तर समाजात दोन प्रकारची माणसे असतात. एक जी प्रतिकूल परिस्थितीसमोर हात टेकवतात. तर दुसरे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावतात. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणारेच यशस्वी होतात असा इतिहास आहे. यशस्वी होण्यासाठी समर्पणाची भावना, क्षमता याबरोबरच धोका पत्करण्याचे धाडसही लागते. धोका पत्करुन प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ठेवा. तुम्ही ही एक सफल, यशस्वी, साहसी व्यक्तिमत्व म्हणून समाजात आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल.

अर्थशास्त्रात ' टेक द रिस्क, गेन द प्रॉफीट ' म्हणजेच 'धोका पत्करा आणि फायदा मिळवा' असे एक सुत्र आहे. जो साहसी असतो त्यालाच भाग्य ही साथ देते. त्यामुळे जीवनात समस्या, अडचण धोका येताच हतबल न होता त्यांना सामोरे जावुन दोन हात करा. धाडसाने परिस्थितीशी सामना करा. म्हणजे तुम्हाला यशोमार्ग सापडेल. धोका पत्करा म्हणजे वेडयासारखे पोहता येत नसताना पाण्यात उडी माराल तर तो तुमचा मुर्खपणा ठरेल. धोका पत्करताना दोनही बाजूंचा विचार करणे आवश्यक असते. जे यशस्वी झालेले आहेत त्यांची जिद्द, कष्ट, कामाशी एकरुपता याच गोष्टीची चर्चा होते परंतू त्यांनी धोका पत्करल्याची चर्चा होत नाही. वास्तविक यशाचे शिखर धोका पत्करण्याच्या पायावरच उभे राहते. आम्हीही आयुष्यात जोखीम उचलली होती मात्र अपेक्षीत यश मिळाले नाही. असे सांगणारे जगात अनेक जण आहेत., परंतु ते प्रत्ये कनवे काम सुरु करणे याला जोखीम समजतात हे चुकीचे आहे. जोखमीचे एक मानसशास्त्र आहे. ते ज्याला समजते त्यालाच जोखीम उचलण्याचा फायदा होतो. बाजारपेठेतील चढ उताराचा बारकाईने अभ्यास करणारासच त्याने साठा केलेल्या मालावूर भरपूर नफा मिळत असतो.
जोखीम उचलली की यश मिळते, असा ही गैरसमज करुन घेवु नका. जोखीम अथवा धोका उचलल्यानंतर समर्पित भावनेने कष्ट करावे लागतात. 'ध्येय ' गाठताना फक्त ध्येयावरच लक्ष दिले त्याचा अनू फक्त त्याच्यासंबंधीचे विचार करण्ो याला समर्पित भावना म्हणता येईल आणि त्यानंतर ध्येय पुर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले की काम हमखास पूर्णत्वाला जाईल. जो माणूस प्रामाणिकपणे, दृढ विश्वासाने जोखीम उचलतो तो गरजेनुसार कष्टही करतो. त्यामुळे त्याला ध्येय पुर्ण करण्यास कोणतीही अडचण येत नाही. जोखीम उचलली आहे तर तिच्यामुळे होणाऱ्या फायदा-नुकसानीस आपणच जबाबदार असतो हे ही लक्षात ठेवा.

Sunday, September 21, 2008

हवी जर यशसिध्दी मंत्र हे ध्यानी घ्या आधी

१) आजच्या स्पर्धायुगात चहुकडे स्पर्धा व असुरक्षिततेचे वातावरण असताना तरुणांना आपल्या करीअरला नवी उंची द्यावी लागत आहे. जीवनात लवकरात लवकर यशस्वी होण्यासाठी प्रत्येक तरुण यशस्वी प्रोफेशनल होण्याचा प्रयत्न करीत आहे. यशस्वी प्रोफेशनल होणसाठी काही सर्वसामान्य नियम आजपासूनच पाळायला हवेत.
२) टाइम मॅनेजमेंट :- आपल्या क्षेंत्रातील कोणाही यशस्वी माणसाच्या दिनचर्येचा नीट अभ्यास करा. त्यातून आपण बरेच काही शिकू शकाल. सामान्य माणसाइतकाच वेळ यशस्वी माणसाकडेही असतो. पण तो त्या वेळेचे व्यवस्थित मॅनेजमेंट करुन अधिकाधिक वापर करतो.
३) सकारात्मक :- कोणतेही काम करताना त्याचा सकारात्मक विचार करावा. नकारात्मक विचारांचा आपल्या उत्साहावर व कृतीवर परिणाम होतो. जगातील महापुरुषांनी सकारात्मकतेच्या बळावर महान कार्य केले आहे.
४) नियोजन :- नियोजनामुळे कामाला बंदिस्तपणा येतो। तीच यशस्वी प्रोफेशनलची ओळख आहे. अशी माणसे विचारपुर्वक योजना आखून आपली कामगिरी यशस्वी करीत असतात.
५) निर्णयक्षमता :- आपली निर्णय क्षमता आपल्या यशाचा कालावधी वाढवतो। योग्य वेळी योग्य निर्णय घेणे यातून आपली पात्रता दिसत असते। यामुळे आपल्या प्रगतीतील अडसर दूर होतील।
६) संवाद :- यशस्वी व्यावसायिकाची कम्युनिकेशन स्किल सशक्त असणे अत्यंत आवश्यक आहे। आपले विचार, आपली मते इतरांपर्यत आपण कसे पोहोचवतो यावर आपले यश अवलंबून असते।
७) श्रवण क्षमता :- उतावळीपणा बऱ्याचदा घातक ठरतो. आपल्या संपर्कातील लहान मोठया व्यक्तींचे मत, म्हणणे ऐकुन घेण्याची सवय लावा. व्यावसायिकतेसाठी इतरांचे ऐकून घेणे आवश्यक आहे.जोखीम :- साहसीपणा हा गुणही आपण जोपासायला हवा. धाडसाने जोखीम उचलणारा यशस्वी होतो. जो जेवढी रिस्क घेईल, त्याला तेवढे जास्त यश मिळेल. बऱ्याचदा मनापासून श्रम करुनही यश मिळत नाही. अशा वेळी परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा व निराश न होता जोमाने कामाला लागा.

यशस्वी होण्यासाठी

आजच्या स्पर्धायुगात चहुकडे स्पर्धा व असुरक्षिततेचे वातावरण असताना करिअरला नवी उंची द्यावी लागत आहे. जिवनात लवकरात लवकर यशस्वी होण्यासाठी प्रत्येक तरुण यशस्वी प्रोफेशनल होण्याचा प्रयत्न करीत आहे. यशस्वी प्रोफेशनल होण्यासाठी काही सर्वसामान्य नियम पाळायला हवेत.
◌ टाईम मॅनेजमेंट : आपल्या क्षेत्रातील कोणाही यशस्वी माणसाच्या दिनचर्येचा निट अभ्यास करा। त्यातुन आपण बरेच काही शिकू शकाल। सामान्य माणसा इतकाच वेळ यशस्वी माणसाकडेही असतो। पण तो त्या वेळेचे व्यवस्थित मॅनेजमेंट करुन अधिकाधिक वापर करतो।
◌ सकारात्मक : कोणतेही काम करताना त्याचा सकारात्मक विचार करावा. नकारात्मक विचारांचा आपल्या उत्साहावर व कृतीवर परिणाम होतो. जगातील महापुरुषांनी सकारात्मकतेच्या बळावर महान कार्य केले आहे।
◌ नियोजन : नियोजनामुळे कामाला बंदिस्तपणा येतो. तिच प्रोफ़ेशनलची ओळख आहे. अशी माणसे विचारपुर्वक योजना आखुन आपली कामगिरी यशस्वी करीत असतात।
◌ निर्णयक्षमता : आपली निर्णयक्षमता आपल्या यशाचा कालावधी वाढवतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे यातून आपली पात्रता दिसत असते. यामुळे आपल्या प्रगतीतील अडसर दुर होतील।
◌ संवाद : यशस्वी व्यावसायिकाचो कम्य़ुनिकेशन स्किल सशक्त असणे अत्यंत आवश्यक आहे. आपले विचार आपली मते इतरांपर्यंत आपण कसे पोहोचवतो यावर आपले यश अवलंबुन असते.
जो आपल्या वाटयाला आलेल्या सामान्य कामाविषयी कुरकुरतो, तो सर्वच कामाविषयी कुरकुर करिल. नेहमी कुरकुर करणारा मनुष्य जिवनात नेहमीच दुःख भोगतो. तो कोणतेही काम हाती घेतो, त्यात त्याला यश म्हणुन येत नाही. पण जो मनुष्य अंग मोडुन आपले कर्तव्य चोखपणे बजावतो, तो यशस्वी होतो आणि त्याला अधिकाधिक कार्य करण्याची संधी मिळते. - स्वामी विवेकानंद