Sunday, April 11, 2010

गॉगल टीव्ही!

आता मोठया आकाराच्या टीव्हीसमोर बसुन राहण्याची आवश्यकता नाही, कारण जपानमधील एका कंपनीने गॉगल टीव्ही बनवीला आहे. गॉगलच्या काचेवर अगदी टीव्हीप्रमाणेच दृश्य दिसते व इअरफोनद्वारे फक्त स्वत:पुरताच आवाज ऎकु येतो. त्यामुळे आता आपला टिव्ही पाहण्यामुळे इतरांना डिस्टर्ब होण्याचा प्रश्नच येत नाही.

आता इ-मेल टि शर्ट वापरा


सेलफोन, ई-मेल, लॅड लाईन आणि स्नेलमेल आपल्या दिमतीस असताना आपण सतत कनेक्टेड असणारच यात काहीच शंका येवु नये, याकरिता आत चक्क ई-मेल टी शर्टच उपलब्ध झाले आहेत. या नव्या हाय-टेक टी शर्टमध्ये, एल.ई.डी. विद्युतवाहक धागा, ब्ल्युटुथ डोंगल आणि ऑर्डुइनो लिलीपॅड मायक्रोकंट्रोलर अशा अनेक साधनांचा वापर करण्यात आलेला आहे.

टी-शर्ट वर पुढच्या बाजूला ऍन्ड्रॉईड फोनवर येणारे ई-मेल ब्ल्युटूथ द्वारे रिसीव्ह होतात. सहच वाचता येईल एवढयाच वेगाने टी-शर्टवर ई-मेल दिसतात. या ई-मेल टी-शर्टवरील अनोख्या इनबॉक्सने आपण सतत टचमध्ये राहाला हे मात्र नक्की!

Saturday, April 3, 2010

टेलीपॅथी कॉम्प्युटर

लंडन येथील शास्त्रज्ञांनी ''टेलीपॅथी कॉम्प्युटर'' ची संकल्पना मांडली आहे. हे कॉम्प्युटर मानवी मेंदूमधील हालचाली पाहून म्हणजेच मेंदूच्या ऑर्डर अभ्यासून त्यानुसार अचुकपणे कामे करुन शकतील. असे कॉम्प्युटर आगामी काळात विकसीत करणे शक्य आहे, असा विश्वास या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
या शास्त्रज्ञांनी टेलीपॅथी कॉम्प्युटर सिस्टिमच विकसीत केली आहे. ही यंत्रणा मानवी मेंदूचे वाचन करुन त्यानुसार कामे करु शकते. या प्रक्रियेत जुन्या आठवणींचीही नव्याने उजळणी होते. हे तंत्रज्ञान ''हिप्पोकॅम्पस'' या मेंदुतील भागावर केंद्रित करण्यात आले आहे. मेंदूच्या या भागात आपत्कालीन स्मृती साठवल्या जातात. हिप्पोकॅम्पस मधील स्मृती थोडा काळच लक्षात राहतात, नंतर त्या एकतर विस्मृतीत जातात किंवा मेंदू त्यातील भाग संग्रहित करुन ठेवतो. या यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी 10 स्वयंसेवकांना पाचारण करण्यात आले. त्यांना प्रत्येकी 7-7 मिनीटांच्या तीन डॉक्युमेंटरी दाखवण्यात आल्या त्यात प्रामुख्याने दैनंदिन कामे करणाऱ्या महिला दाखविण्यात आल्या होत्या. या डॉक्युमेंटरीज संपल्यानंतर या स्वयंसेवकांच्या मेंदुना ''एम.आय.आर. स्कॅनर'' जोडण्यात आले. नंतर पाहिलेल्या डॉक्युमेंटरीज क्रमानुसार आठवण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. एम.आय.आर. स्कॅनरने स्वयंसेवकांच्या मेंदुतील रक्तप्रवाहाच्या परिवर्तनाची नोंद केली. या नोंदीवरुन कोणत्या स्वयंसेवकाने कोणती डॉक्युमेंटरी आठवली, हे कॉम्प्युटर सिस्टीमने अचूकपणे शोधून काढले. या सिस्टीमने 80 टक्के बरोबर उत्तरे दिली. ही सिस्टीम अजूनही विकसीत करणे शक्य आहे, असा विश्वास या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.