Friday, October 29, 2010

टॅबलेट पी.सी.


डच् ऍबियन्स् टेक्नॉलॉजी यांनी टॅबलेट पी.सी. तयार केला आहे त्याला नाव दिले आहे "AT-Pad", १०" च्या या टॅबलेट पी.सी. मध्ये Windows 7 Home Premium ऑपरेटींग सिस्टीम आहे. AT-Pad हा Intel Atom प्रोसेसर जो १ जी.बी. रॅम वर चालतो. यामध्ये स्टोरेज करिता १६० जी.बी. ची हार्डडिस्कही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. USB पोर्ट, Card Reader या सोबत LCD Monitor ला जोडण्यासाठी Mini VGA कनेक्टर ही देण्यात आलेला आहे. यामध्ये 3G कनेक्टीवीटीसाठी सिमकार्ड स्लॉट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर video कॉलिंग करिता समोरच १.३ मेगा पिक्सलचा कॅमेरा व माईक्रोफोन देण्यात आलेला आहे. आपण Windows चे प्रोग्रॅम त्यावर वापरु शकता, ज्यामध्ये आपण आपली नॉर्मल कामे करु शकता. डच् ऍबियन्स् टेक्नॉलॉजी हा AT-Pad नोव्हेंबर मध्ये उपलब्ध होईल.

No comments: