Monday, September 22, 2008

जोखीम उचलाल तरच यशस्वी व्हाल

घरात निवांत बसून यश मिळत नसते. यशस्वी होणसाठी धोका पत्करावा लागतो आणि आव्हानांना सामोरे जावे लागते, तेव्हा कोठे यश प्राप्त होते. तसे पाहिले तर समाजात दोन प्रकारची माणसे असतात. एक जी प्रतिकूल परिस्थितीसमोर हात टेकवतात. तर दुसरे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावतात. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणारेच यशस्वी होतात असा इतिहास आहे. यशस्वी होण्यासाठी समर्पणाची भावना, क्षमता याबरोबरच धोका पत्करण्याचे धाडसही लागते. धोका पत्करुन प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ठेवा. तुम्ही ही एक सफल, यशस्वी, साहसी व्यक्तिमत्व म्हणून समाजात आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल.

अर्थशास्त्रात ' टेक द रिस्क, गेन द प्रॉफीट ' म्हणजेच 'धोका पत्करा आणि फायदा मिळवा' असे एक सुत्र आहे. जो साहसी असतो त्यालाच भाग्य ही साथ देते. त्यामुळे जीवनात समस्या, अडचण धोका येताच हतबल न होता त्यांना सामोरे जावुन दोन हात करा. धाडसाने परिस्थितीशी सामना करा. म्हणजे तुम्हाला यशोमार्ग सापडेल. धोका पत्करा म्हणजे वेडयासारखे पोहता येत नसताना पाण्यात उडी माराल तर तो तुमचा मुर्खपणा ठरेल. धोका पत्करताना दोनही बाजूंचा विचार करणे आवश्यक असते. जे यशस्वी झालेले आहेत त्यांची जिद्द, कष्ट, कामाशी एकरुपता याच गोष्टीची चर्चा होते परंतू त्यांनी धोका पत्करल्याची चर्चा होत नाही. वास्तविक यशाचे शिखर धोका पत्करण्याच्या पायावरच उभे राहते. आम्हीही आयुष्यात जोखीम उचलली होती मात्र अपेक्षीत यश मिळाले नाही. असे सांगणारे जगात अनेक जण आहेत., परंतु ते प्रत्ये कनवे काम सुरु करणे याला जोखीम समजतात हे चुकीचे आहे. जोखमीचे एक मानसशास्त्र आहे. ते ज्याला समजते त्यालाच जोखीम उचलण्याचा फायदा होतो. बाजारपेठेतील चढ उताराचा बारकाईने अभ्यास करणारासच त्याने साठा केलेल्या मालावूर भरपूर नफा मिळत असतो.
जोखीम उचलली की यश मिळते, असा ही गैरसमज करुन घेवु नका. जोखीम अथवा धोका उचलल्यानंतर समर्पित भावनेने कष्ट करावे लागतात. 'ध्येय ' गाठताना फक्त ध्येयावरच लक्ष दिले त्याचा अनू फक्त त्याच्यासंबंधीचे विचार करण्ो याला समर्पित भावना म्हणता येईल आणि त्यानंतर ध्येय पुर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले की काम हमखास पूर्णत्वाला जाईल. जो माणूस प्रामाणिकपणे, दृढ विश्वासाने जोखीम उचलतो तो गरजेनुसार कष्टही करतो. त्यामुळे त्याला ध्येय पुर्ण करण्यास कोणतीही अडचण येत नाही. जोखीम उचलली आहे तर तिच्यामुळे होणाऱ्या फायदा-नुकसानीस आपणच जबाबदार असतो हे ही लक्षात ठेवा.

No comments: