Thursday, September 25, 2008

प्रयत्नांनी स्वप्ने साकार करा.

* जी व्यक्ती अत्यंत सुंदर कल्पनांमध्ये मनापासून रमते ती व्यक्ती त्या कल्पना एक दिवस खऱ्या करुन दाखविते. जे आपली स्पप्ने मनात काळजीने बाळगून ते साकार होण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना जरुर यश मिळते. कोलंबस एका दुसऱ्या जगाची कल्पना मनात बाळगून होता. तो त्याच्या प्रयत्नात यशस्वी ठरला. आपल्या कल्पना मनात कायमच्या बाळगा. तुमची दृष्टी तुमच्या स्वप्नांवरच असू द्या. तुम्ही मनात आकारलेल्या सौदर्याला कायमचे स्थान द्या. तुमच्या अत्यंत शुध्द विचारांना मनात बाळगून ठेवा. ज्या सुंदर कल्पना तुम्ही मनात बाळगाल त्या खऱ्या जगात आणण्यासाठी मनापासून नक्कीच प्रयत्न कराल.

* कोणतीही इच्छा ती पुर्ण करण्यासाठी करा. कोणतीही कल्पना प्राप्त करण्यासाठीच करा. असे कधी झाले आहे का? आपण धीर धरुन प्रयत्न केल्यानंतरच इच्छा प्रदर्शित केल्याबरोबर पुर्ण होईल, असे कधी झाले आहे का? आपण धीर धरुन प्रयत्न केल्यानंतरच इच्छापुर्ती होते. तुम्ही जसे स्वप्न बघाल तसे व्हाल. तुमच्या कल्पनेत तुम्ही शेवटी कसे असले पाहिजे याचा विचार करा.

* आपणही तारुण्यात एखादयाच मुख्य ध्येयावर आपली दृष्टी ठेवा. आपली ही दृष्टी आणि इतर कल्पना यातील फरक समजून घ्या. आपली ही दृष्टी आणि इतर कल्पना यातील फरक समजूर घ्या. इतर कल्पना आणि आपल्या मुख्य ध्येयाच्या दृष्टीत घोटाळा करु नका. तुमचे खरोखरच विशेष ज्या गोष्टींवर प्रेम असते त्या गोष्टीवर हृदयपुर्वक दिव्यदृष्टी ठेवा.

* गंभीरातील गंभीर रुग्णाची प्रकृती अगदी ठिक होण्यात औषधांची भूमिका केवळ दहा टक्केच असते, असे डॉक्टरांचे मत आहे. रुग्ण 50 टक्के आपला सकारात्मक विचार व 40 टक्के डॉक्टरांच्या सकारात्मक विचाराने बरा होतो.

* असं कधीही म्हणु नका की पाच वर्षाचा काळ तर खूप मोठा आहे आणि तोपर्यत प्रगती करण्यासाठी मी थांबू शकत नाही. नेहमी असा विचार करा की मला तर 30 वर्षापर्यत उच्च पदावर राहायचे आहे. एवढया प्रदीर्घ काळात पाच वर्ष म्हणजे काय?

* आता काहीच घडु शकत नाही, असा नकारात्मक विचार कधीही करु नका तर प्रयत्न करायला हवा, असा होकरात्मक दृष्टीकोन बाळगा.

* मार्केटींगच्या क्षेत्रात असाल तर मी हे प्रॉडक्ट विकू शकणार नाही, असा विचार कदापी करु नका. तथापी एखादे प्रॉडक्ट तुम्ही विकू शकत नसाल तरीही असा विचार करा की, मला लवकरच असा एखादा फॉम्युला मिळेल की ज्यामुळे मी प्रॉडक्ट विकण्यात यशस्वी होईन.

* आजकाल स्पर्धा तर जबरदस्त आहे. त्याबाबत कोणही असहमत असू शकत नाही. तरीही अशा स्पर्धेत एखादाच कुणी फायदा लाटुन घेवुन जाईल. अस होवु शकत नाही. निश्चितपणे आपले कष्ट त्यासाठी उपयोगी ठरतील. कष्टाच्या आधारे तुम्हीही हा फायदा किंवा लाभा उठवु शकता.

* वेळेची किंमत जाणणे हा सर्वात मोठा शहाणपणा आहे. दुसऱ्याचा वाईटपणा, उणेदुणे पणा, फालतु गप्पा यात वेळ घालविणारे कधीच प्रगती करु शकत नाहीत.

* आजचे काम आजच पुर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करा. चालढकल, फाटे फोडणे यांतून काहीच साध्य होत नाही, हे नेमके लक्षात ठेवा।

* एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल, समजली नसेल तर ती दुसऱ्याकडून शिकुन घ्यायची सवय लावा. त्यात कमीपणा मानू नका.

No comments: