Wednesday, September 1, 2010
पहा ४०० संपुर्ण चित्रपट ते ही मोफत
यु-टयुब ने सुरु केले आहे नविन मुव्ही चॅनेल. या मध्ये ४०० संपुर्ण चित्रपटांचा समावेश आहे. आपण आपल्या मागणी प्रमाणे चित्रपट पाहु शकता आणि तेही मोफत. त्यांची वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये विभागणी केलेली आहे. उदा. डॉक्युमेंट्री आणि बायोग्राफी, बॉलीवुड, ऍक्शन आणि ऍड्वेंचर, कॉमेडी, हॉरर, मिस्ट्री आणि सस्पेंन्स, ड्रामा, ऍनीमेशन आणि कार्टुन आणि नवीन दाखल होणारे चित्रपट. पहा आणि ऍजॉय करा हो आणि आपले अभिप्राय जरुर कळवा.
ब्लॉगरसाठी नविन गझेट
ब्लॉगर.कॉम ने आपल्या ब्लॉग वाचकांसाठी त्याचे ब्लॉग स्टेट्स आणि पॉप्युलर पोस्ट ही दोन नविन गझेट उपलब्ध करुन दिले आहेत. पॉप्युलर पोस्ट : हे गझेट आपल्या ब्लॉगवरील कोणता लेख जास्तीत जास्त वाचकांनी वाचला याची माहिती आपल्या ब्लॉग वरील वाचकांना तात्काळ उपलब्ध करुन देते. हे गझेट वेगवेगळ्या स्टाईल आणि कॉन्फीगरेशन मध्ये उपलब्ध आहे. ते आपण ऑल टाईम, मागील ३० दिवस किंवा ७ दिवसांसाठी सेट करु शकता.
ब्लॉग स्टेट्स : या गझेटसाठी लागणारी आवश्यक माहिती हे गझेट ब्लॉगर स्टेट्स वरुन घेते. ब्लॉग स्टेट्स आपल्या ब्लॉगचे पेज व्ह्यु डिस्प्ले करते. हे गझेट वेगवेगळ्या स्टाईल मध्ये उपलब्ध आहे. हा पण आपण हे गझेट विस्थापित केल्यापासुन पेज व्ह्यु डिस्प्ले करते आपण ब्लॉग सुरु केल्यापासुन नाही. बघा वापरुन आणि आपले अभिप्राय जरुर कळवा.
Subscribe to:
Posts (Atom)