Sunday, September 28, 2008
संयम व सरळपणा :
करिअरमधील यशासाठी
आपल्या चुकांपासून शिका : जे स्वबळावर यश मिळवू इच्छीत असतता ते आपल्या चुकांतून धडा घेणे जाणत असतात. आपल्या विचारात सकारात्मक बदल करुन मार्गात येणा-या छोटया मोठया अडचणींवर मात करा.
सल्ला घेण्यास तत्परता दाखवा : यशाच्या मुख्य नियमातील दुसरा महत्वाचा नियम इतरांचे ऐकून घेणे यातून आपल्याला महत्वाचे टर्निग पॉइंटही मिळू शकतात.
विलंब टाळा : सुसंधी कोणाची वाट पहात नसते. आणि गेलेली वेळही परतून येत नसते. यासाठी कोणतेही काम वेळीच पूर्ण करा.
हाती घ्याल ते तडीस न्या : विलंबानंतरचा महत्वाचा इशारा म्हणजे एखादया कामाला सुरुवात केल्यानंतर कितीही अडचणी आल्या तरी ते पूर्ण करा. परंतू त्यासाठी शॉर्टकर्ट वापरु नका.
वेगळे काम करा : आखीव, रेखीव रुळलेल्या मार्गाने काम केल्यास यश मिळत नाही. अपयशी माणसांचा एक सर्वसामान्य दोष म्हणजे ते नेहमी नवे काही करुन दाखविण्याची व कष्ट करण्याची टाळटाळ करतात.
इतरांना दोष देऊ नका : वेळेचा अपव्यय व कामात रस न घेणे हे अपयशाला कारणीभूत असतात, अपयशी माणसे स्थिती सुधारण्याऐवजी इतरांना दोष देत राहतात.
कंपनीची निवड दक्षतेने करा : अपयश अपयशी लोकांकडे खेचते. यशस्वी व्यक्ती यशस्वी व्यक्तींकडेच जातात हे लक्षात ठेवूनच जॉब स्विकारा.
Monday, September 22, 2008
जोखीम उचलाल तरच यशस्वी व्हाल
अर्थशास्त्रात ' टेक द रिस्क, गेन द प्रॉफीट ' म्हणजेच 'धोका पत्करा आणि फायदा मिळवा' असे एक सुत्र आहे. जो साहसी असतो त्यालाच भाग्य ही साथ देते. त्यामुळे जीवनात समस्या, अडचण धोका येताच हतबल न होता त्यांना सामोरे जावुन दोन हात करा. धाडसाने परिस्थितीशी सामना करा. म्हणजे तुम्हाला यशोमार्ग सापडेल. धोका पत्करा म्हणजे वेडयासारखे पोहता येत नसताना पाण्यात उडी माराल तर तो तुमचा मुर्खपणा ठरेल. धोका पत्करताना दोनही बाजूंचा विचार करणे आवश्यक असते. जे यशस्वी झालेले आहेत त्यांची जिद्द, कष्ट, कामाशी एकरुपता याच गोष्टीची चर्चा होते परंतू त्यांनी धोका पत्करल्याची चर्चा होत नाही. वास्तविक यशाचे शिखर धोका पत्करण्याच्या पायावरच उभे राहते. आम्हीही आयुष्यात जोखीम उचलली होती मात्र अपेक्षीत यश मिळाले नाही. असे सांगणारे जगात अनेक जण आहेत., परंतु ते प्रत्ये कनवे काम सुरु करणे याला जोखीम समजतात हे चुकीचे आहे. जोखमीचे एक मानसशास्त्र आहे. ते ज्याला समजते त्यालाच जोखीम उचलण्याचा फायदा होतो. बाजारपेठेतील चढ उताराचा बारकाईने अभ्यास करणारासच त्याने साठा केलेल्या मालावूर भरपूर नफा मिळत असतो.
जोखीम उचलली की यश मिळते, असा ही गैरसमज करुन घेवु नका. जोखीम अथवा धोका उचलल्यानंतर समर्पित भावनेने कष्ट करावे लागतात. 'ध्येय ' गाठताना फक्त ध्येयावरच लक्ष दिले त्याचा अनू फक्त त्याच्यासंबंधीचे विचार करण्ो याला समर्पित भावना म्हणता येईल आणि त्यानंतर ध्येय पुर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले की काम हमखास पूर्णत्वाला जाईल. जो माणूस प्रामाणिकपणे, दृढ विश्वासाने जोखीम उचलतो तो गरजेनुसार कष्टही करतो. त्यामुळे त्याला ध्येय पुर्ण करण्यास कोणतीही अडचण येत नाही. जोखीम उचलली आहे तर तिच्यामुळे होणाऱ्या फायदा-नुकसानीस आपणच जबाबदार असतो हे ही लक्षात ठेवा.
Sunday, September 21, 2008
हवी जर यशसिध्दी मंत्र हे ध्यानी घ्या आधी
१) आजच्या स्पर्धायुगात चहुकडे स्पर्धा व असुरक्षिततेचे वातावरण असताना तरुणांना आपल्या करीअरला नवी उंची द्यावी लागत आहे. जीवनात लवकरात लवकर यशस्वी होण्यासाठी प्रत्येक तरुण यशस्वी प्रोफेशनल होण्याचा प्रयत्न करीत आहे. यशस्वी प्रोफेशनल होणसाठी काही सर्वसामान्य नियम आजपासूनच पाळायला हवेत.
२) टाइम मॅनेजमेंट :- आपल्या क्षेंत्रातील कोणाही यशस्वी माणसाच्या दिनचर्येचा नीट अभ्यास करा. त्यातून आपण बरेच काही शिकू शकाल. सामान्य माणसाइतकाच वेळ यशस्वी माणसाकडेही असतो. पण तो त्या वेळेचे व्यवस्थित मॅनेजमेंट करुन अधिकाधिक वापर करतो.
३) सकारात्मक :- कोणतेही काम करताना त्याचा सकारात्मक विचार करावा. नकारात्मक विचारांचा आपल्या उत्साहावर व कृतीवर परिणाम होतो. जगातील महापुरुषांनी सकारात्मकतेच्या बळावर महान कार्य केले आहे.
४) नियोजन :- नियोजनामुळे कामाला बंदिस्तपणा येतो। तीच यशस्वी प्रोफेशनलची ओळख आहे. अशी माणसे विचारपुर्वक योजना आखून आपली कामगिरी यशस्वी करीत असतात.
५) निर्णयक्षमता :- आपली निर्णय क्षमता आपल्या यशाचा कालावधी वाढवतो। योग्य वेळी योग्य निर्णय घेणे यातून आपली पात्रता दिसत असते। यामुळे आपल्या प्रगतीतील अडसर दूर होतील।
६) संवाद :- यशस्वी व्यावसायिकाची कम्युनिकेशन स्किल सशक्त असणे अत्यंत आवश्यक आहे। आपले विचार, आपली मते इतरांपर्यत आपण कसे पोहोचवतो यावर आपले यश अवलंबून असते।
७) श्रवण क्षमता :- उतावळीपणा बऱ्याचदा घातक ठरतो. आपल्या संपर्कातील लहान मोठया व्यक्तींचे मत, म्हणणे ऐकुन घेण्याची सवय लावा. व्यावसायिकतेसाठी इतरांचे ऐकून घेणे आवश्यक आहे.जोखीम :- साहसीपणा हा गुणही आपण जोपासायला हवा. धाडसाने जोखीम उचलणारा यशस्वी होतो. जो जेवढी रिस्क घेईल, त्याला तेवढे जास्त यश मिळेल. बऱ्याचदा मनापासून श्रम करुनही यश मिळत नाही. अशा वेळी परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा व निराश न होता जोमाने कामाला लागा.
यशस्वी होण्यासाठी
◌ टाईम मॅनेजमेंट : आपल्या क्षेत्रातील कोणाही यशस्वी माणसाच्या दिनचर्येचा निट अभ्यास करा। त्यातुन आपण बरेच काही शिकू शकाल। सामान्य माणसा इतकाच वेळ यशस्वी माणसाकडेही असतो। पण तो त्या वेळेचे व्यवस्थित मॅनेजमेंट करुन अधिकाधिक वापर करतो।