Wednesday, September 1, 2010

ब्लॉगरसाठी नविन गझेट



ब्लॉगर.कॉम ने आपल्या ब्लॉग वाचकांसाठी त्याचे ब्लॉग स्टेट्स आणि पॉप्युलर पोस्ट ही दोन नविन गझेट उपलब्ध करुन दिले आहेत. पॉप्युलर पोस्ट : हे गझेट आपल्या ब्लॉगवरील कोणता लेख जास्तीत जास्त वाचकांनी वाचला याची माहिती आपल्या ब्लॉग वरील वाचकांना तात्काळ उपलब्ध करुन देते. हे गझेट वेगवेगळ्या स्टाईल आणि कॉन्फीगरेशन मध्ये उपलब्ध आहे. ते आपण ऑल टाईम, मागील ३० दिवस किंवा ७ दिवसांसाठी सेट करु शकता.
ब्लॉग स्टेट्स : या गझेटसाठी लागणारी आवश्यक माहिती हे गझेट ब्लॉगर स्टेट्स वरुन घेते. ब्लॉग स्टेट्स आपल्या ब्लॉगचे पेज व्ह्यु डिस्प्ले करते. हे गझेट वेगवेगळ्या स्टाईल मध्ये उपलब्ध आहे. हा पण आपण हे गझेट विस्थापित केल्यापासुन पेज व्ह्यु डिस्प्ले करते आपण ब्लॉग सुरु केल्यापासुन नाही. बघा वापरुन आणि आपले अभिप्राय जरुर कळवा.

Friday, May 7, 2010

परिवर्तन २.०

मित्रहो मराठी ब्लॉगचे विश्व झपाट्याने विस्तारत आहे. बरेच ब्लॉगर्स मराठीमध्ये ब्लॉग लिहिण्यासाठी बराहा वा तत्सम संगणक प्रणालीचा वापर करतात. परंतु ब-याच जणांना वेगवेगळ्या फ़ॉण्ट मध्ये (आकृती, अंकुर, ISM, कलाकार, कृतीदेव, मिलेनियम, शिवाजी, श्रीलिपी इ.) लिहीण्याचा सराव असतो. त्यामुळे बराहा मधुन युनिकोड फॉण्ट मध्ये टंकलेखन करणे थोडे अवघड जाते. पण असं काही करता आलं तर की, तुम्ही नेहमी वापरत असलेल्या फॉन्ट्मध्ये टंकलेखन केले आणि एक क्लिक करताच संपुर्ण लेख युनिकोड फॉण्ट मध्ये परिवर्तीत झाला तर. हे होऊ शकते ? असं शक्य आहे? असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. परंतु या सर्व प्रश्नांचे ऊत्तर एकच आहे "होय हे शक्य आहे".
याकरिता मी आपणाला एका अशा संगणक प्रणालीची माहिती देणार आहे. तुम्ही नेहमी वापरत असलेल्या फॉन्ट्मध्ये टंकलेखन केले आणि एक क्लिक करताच संपुर्ण लेख युनिकोड फॉण्ट मध्ये परिवर्तीत करता येईल. अशा या संगणक प्रणालीचे नाव आहे "परिवर्तन" हि एक अशी संगणक प्रणाली आहे जी आपण कोणत्याही फॉण्ट मध्ये तयार केलेला लेख वेगवेगळ्या फॉण्ट मध्ये परिवर्तित करते.
परिवर्तन २.० संगणक प्रणाली डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.आणि आपले अभिप्राय जरुर कळवा.
Parivartan.rar">http://www.4shared.com/file/J_e3A4Vc/Parivartan.html" target=_blank>Parivartan.rar

Sunday, April 11, 2010

गॉगल टीव्ही!

आता मोठया आकाराच्या टीव्हीसमोर बसुन राहण्याची आवश्यकता नाही, कारण जपानमधील एका कंपनीने गॉगल टीव्ही बनवीला आहे. गॉगलच्या काचेवर अगदी टीव्हीप्रमाणेच दृश्य दिसते व इअरफोनद्वारे फक्त स्वत:पुरताच आवाज ऎकु येतो. त्यामुळे आता आपला टिव्ही पाहण्यामुळे इतरांना डिस्टर्ब होण्याचा प्रश्नच येत नाही.

आता इ-मेल टि शर्ट वापरा


सेलफोन, ई-मेल, लॅड लाईन आणि स्नेलमेल आपल्या दिमतीस असताना आपण सतत कनेक्टेड असणारच यात काहीच शंका येवु नये, याकरिता आत चक्क ई-मेल टी शर्टच उपलब्ध झाले आहेत. या नव्या हाय-टेक टी शर्टमध्ये, एल.ई.डी. विद्युतवाहक धागा, ब्ल्युटुथ डोंगल आणि ऑर्डुइनो लिलीपॅड मायक्रोकंट्रोलर अशा अनेक साधनांचा वापर करण्यात आलेला आहे.

टी-शर्ट वर पुढच्या बाजूला ऍन्ड्रॉईड फोनवर येणारे ई-मेल ब्ल्युटूथ द्वारे रिसीव्ह होतात. सहच वाचता येईल एवढयाच वेगाने टी-शर्टवर ई-मेल दिसतात. या ई-मेल टी-शर्टवरील अनोख्या इनबॉक्सने आपण सतत टचमध्ये राहाला हे मात्र नक्की!

Saturday, April 3, 2010

टेलीपॅथी कॉम्प्युटर

लंडन येथील शास्त्रज्ञांनी ''टेलीपॅथी कॉम्प्युटर'' ची संकल्पना मांडली आहे. हे कॉम्प्युटर मानवी मेंदूमधील हालचाली पाहून म्हणजेच मेंदूच्या ऑर्डर अभ्यासून त्यानुसार अचुकपणे कामे करुन शकतील. असे कॉम्प्युटर आगामी काळात विकसीत करणे शक्य आहे, असा विश्वास या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
या शास्त्रज्ञांनी टेलीपॅथी कॉम्प्युटर सिस्टिमच विकसीत केली आहे. ही यंत्रणा मानवी मेंदूचे वाचन करुन त्यानुसार कामे करु शकते. या प्रक्रियेत जुन्या आठवणींचीही नव्याने उजळणी होते. हे तंत्रज्ञान ''हिप्पोकॅम्पस'' या मेंदुतील भागावर केंद्रित करण्यात आले आहे. मेंदूच्या या भागात आपत्कालीन स्मृती साठवल्या जातात. हिप्पोकॅम्पस मधील स्मृती थोडा काळच लक्षात राहतात, नंतर त्या एकतर विस्मृतीत जातात किंवा मेंदू त्यातील भाग संग्रहित करुन ठेवतो. या यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी 10 स्वयंसेवकांना पाचारण करण्यात आले. त्यांना प्रत्येकी 7-7 मिनीटांच्या तीन डॉक्युमेंटरी दाखवण्यात आल्या त्यात प्रामुख्याने दैनंदिन कामे करणाऱ्या महिला दाखविण्यात आल्या होत्या. या डॉक्युमेंटरीज संपल्यानंतर या स्वयंसेवकांच्या मेंदुना ''एम.आय.आर. स्कॅनर'' जोडण्यात आले. नंतर पाहिलेल्या डॉक्युमेंटरीज क्रमानुसार आठवण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. एम.आय.आर. स्कॅनरने स्वयंसेवकांच्या मेंदुतील रक्तप्रवाहाच्या परिवर्तनाची नोंद केली. या नोंदीवरुन कोणत्या स्वयंसेवकाने कोणती डॉक्युमेंटरी आठवली, हे कॉम्प्युटर सिस्टीमने अचूकपणे शोधून काढले. या सिस्टीमने 80 टक्के बरोबर उत्तरे दिली. ही सिस्टीम अजूनही विकसीत करणे शक्य आहे, असा विश्वास या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.