मित्रहो मराठी ब्लॉगचे विश्व झपाट्याने विस्तारत आहे. बरेच ब्लॉगर्स मराठीमध्ये ब्लॉग लिहिण्यासाठी बराहा वा तत्सम संगणक प्रणालीचा वापर करतात. परंतु ब-याच जणांना वेगवेगळ्या फ़ॉण्ट मध्ये (आकृती, अंकुर, ISM, कलाकार, कृतीदेव, मिलेनियम, शिवाजी, श्रीलिपी इ.) लिहीण्याचा सराव असतो. त्यामुळे बराहा मधुन युनिकोड फॉण्ट मध्ये टंकलेखन करणे थोडे अवघड जाते. पण असं काही करता आलं तर की, तुम्ही नेहमी वापरत असलेल्या फॉन्ट्मध्ये टंकलेखन केले आणि एक क्लिक करताच संपुर्ण लेख युनिकोड फॉण्ट मध्ये परिवर्तीत झाला तर. हे होऊ शकते ? असं शक्य आहे? असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. परंतु या सर्व प्रश्नांचे ऊत्तर एकच आहे "होय हे शक्य आहे".
याकरिता मी आपणाला एका अशा संगणक प्रणालीची माहिती देणार आहे. तुम्ही नेहमी वापरत असलेल्या फॉन्ट्मध्ये टंकलेखन केले आणि एक क्लिक करताच संपुर्ण लेख युनिकोड फॉण्ट मध्ये परिवर्तीत करता येईल. अशा या संगणक प्रणालीचे नाव आहे "परिवर्तन" हि एक अशी संगणक प्रणाली आहे जी आपण कोणत्याही फॉण्ट मध्ये तयार केलेला लेख वेगवेगळ्या फॉण्ट मध्ये परिवर्तित करते.
परिवर्तन २.० संगणक प्रणाली डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.आणि आपले अभिप्राय जरुर कळवा.
Parivartan.rar">http://www.4shared.com/file/J_e3A4Vc/Parivartan.html" target=_blank>Parivartan.rar
Friday, May 7, 2010
Sunday, April 11, 2010
गॉगल टीव्ही!
आता इ-मेल टि शर्ट वापरा

सेलफोन, ई-मेल, लॅड लाईन आणि स्नेलमेल आपल्या दिमतीस असताना आपण सतत कनेक्टेड असणारच यात काहीच शंका येवु नये, याकरिता आत चक्क ई-मेल टी शर्टच उपलब्ध झाले आहेत. या नव्या हाय-टेक टी शर्टमध्ये, एल.ई.डी. विद्युतवाहक धागा, ब्ल्युटुथ डोंगल आणि ऑर्डुइनो लिलीपॅड मायक्रोकंट्रोलर अशा अनेक साधनांचा वापर करण्यात आलेला आहे.
टी-शर्ट वर पुढच्या बाजूला ऍन्ड्रॉईड फोनवर येणारे ई-मेल ब्ल्युटूथ द्वारे रिसीव्ह होतात. सहच वाचता येईल एवढयाच वेगाने टी-शर्टवर ई-मेल दिसतात. या ई-मेल टी-शर्टवरील अनोख्या इनबॉक्सने आपण सतत टचमध्ये राहाला हे मात्र नक्की!
Saturday, April 3, 2010
टेलीपॅथी कॉम्प्युटर
लंडन येथील शास्त्रज्ञांनी ''टेलीपॅथी कॉम्प्युटर'' ची संकल्पना मांडली आहे. हे कॉम्प्युटर मानवी मेंदूमधील हालचाली पाहून म्हणजेच मेंदूच्या ऑर्डर अभ्यासून त्यानुसार अचुकपणे कामे करुन शकतील. असे कॉम्प्युटर आगामी काळात विकसीत करणे शक्य आहे, असा विश्वास या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.या शास्त्रज्ञांनी टेलीपॅथी कॉम्प्युटर सिस्टिमच विकसीत केली आहे. ही यंत्रणा मानवी मेंदूचे वाचन करुन त्यानुसार कामे करु शकते. या प्रक्रियेत जुन्या आठवणींचीही नव्याने उजळणी होते. हे तंत्रज्ञान ''हिप्पोकॅम्पस'' या मेंदुतील भागावर केंद्रित करण्यात आले आहे. मेंदूच्या या भागात आपत्कालीन स्मृती साठवल्या जातात. हिप्पोकॅम्पस मधील स्मृती थोडा काळच लक्षात राहतात, नंतर त्या एकतर विस्मृतीत जातात किंवा मेंदू त्यातील भाग संग्रहित करुन ठेवतो. या यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी 10 स्वयंसेवकांना पाचारण करण्यात आले. त्यांना प्रत्येकी 7-7 मिनीटांच्या तीन डॉक्युमेंटरी दाखवण्यात आल्या त्यात प्रामुख्याने दैनंदिन कामे करणाऱ्या महिला दाखविण्यात आल्या होत्या. या डॉक्युमेंटरीज संपल्यानंतर या स्वयंसेवकांच्या मेंदुना ''एम.आय.आर. स्कॅनर'' जोडण्यात आले. नंतर पाहिलेल्या डॉक्युमेंटरीज क्रमानुसार आठवण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. एम.आय.आर. स्कॅनरने स्वयंसेवकांच्या मेंदुतील रक्तप्रवाहाच्या परिवर्तनाची नोंद केली. या नोंदीवरुन कोणत्या स्वयंसेवकाने कोणती डॉक्युमेंटरी आठवली, हे कॉम्प्युटर सिस्टीमने अचूकपणे शोधून काढले. या सिस्टीमने 80 टक्के बरोबर उत्तरे दिली. ही सिस्टीम अजूनही विकसीत करणे शक्य आहे, असा विश्वास या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
Thursday, March 25, 2010
टच टेक्नॉलॉजी
टच म्हणजे स्पर्श, स्पर्शाची अनुभुती कशी असते, हे भारतीयांना समजावून सांगण्याची नक्कीच गरज नाही. याच स्पर्शाचा वापर करुन आता अत्याधुनिक 'टच टेक्नॉलॉजी' चा जन्म झाला आहे. टच टेक्नॉलॉजीच्या उपकरणामुळे आता पेपर आणि वायरचा वापर बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वी शाळेत हजेरी द्यावी लागत असे, नंतर नोकरी मिळाल्यावर ऑफीसच्या रजिस्टरमध्ये येण्या-जाण्याची वेळ लिहून सही करावी लागत असे. आता कार्ड पंचिग किंवा टच पंचिंग ही आधुनिक पध्दत सुरु झाली आहे. टच टेक्नॉलॉजी इतक्या मोठया प्रमाणात व झपाटयाने विकसीत होत आहे की, जग लवकरच पेपरलेस वायरलेस होणार आहे.
सिंगापूर येथील सायन्स सेंटरने आयलँड स्टेट्स इन्फोकॉम डेव्हलपमेंट ऍर्थारीटी सोबत जोडून हाय-फाय वायरलेस नेटवर्क उभारले आहे. कॉम्प्युटर किंवा डिजीटल पर्सनल कॉम्प्युटरद्वारे सरासरी 10,000/- चौरस क्षेत्रात हे नेटवर्क आहे. जग आता पेपरलेस-वायरलेस पध्दतीकडे वाटचाल करीत आहे. याचे उत्तम उदाहरण नॅशनल स्क्रीन सेंटर आहे. येथील पेपरलेस मेडीकल संस्था सर्व प्रकारच्या सुविधांनी युक्त आहे. याशिवाय अशा प्रकारच्या अनेक इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स आहे. या सिस्टिममध्ये वायर किंवा पेपर चा वापर होत नाही, यालाच टच टेक्नॉलॉजी युग असेही म्हणतात.
सिंगापूर येथील सायन्स सेंटरने आयलँड स्टेट्स इन्फोकॉम डेव्हलपमेंट ऍर्थारीटी सोबत जोडून हाय-फाय वायरलेस नेटवर्क उभारले आहे. कॉम्प्युटर किंवा डिजीटल पर्सनल कॉम्प्युटरद्वारे सरासरी 10,000/- चौरस क्षेत्रात हे नेटवर्क आहे. जग आता पेपरलेस-वायरलेस पध्दतीकडे वाटचाल करीत आहे. याचे उत्तम उदाहरण नॅशनल स्क्रीन सेंटर आहे. येथील पेपरलेस मेडीकल संस्था सर्व प्रकारच्या सुविधांनी युक्त आहे. याशिवाय अशा प्रकारच्या अनेक इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स आहे. या सिस्टिममध्ये वायर किंवा पेपर चा वापर होत नाही, यालाच टच टेक्नॉलॉजी युग असेही म्हणतात.
Subscribe to:
Posts (Atom)
